Wednesday, June 3, 2009

चकोल्या




चकोल्या :English Version

साहित्य :

२ कप गव्हाचे पीठ ,
१ टेबलस्पून हलद,
१ टेबलस्पून हिंग,
१ टेबलस्पून तिखट मिर्ची पावडर,
१ टेबलस्पून बेसन पीठ,
१ टेबलस्पून मीठ,
पाणी
वरणा साठी:

१ कप तुर दाळ,
१ चमचा मोहरी,
१ चमचा हलद,
१ चमचा हिंग,
१ चमचा तिखट मिर्ची पावडर,
१ चमचा चिंचेचा कोळ,
१ चमचा गरम मसाला,
२-३ आमसूल,
१ चमचा गुळ,
१ चमचा तेल .


कृति:
तुर दाळ प्रेशर कुकर मधे एकदम मऊ शिजवून घ्यावी।
तेल गरम करून त्यामधे मोहरी टाकावी , मोहरी तडतडली की मग हिंग , हलद घालावी
कुकर मधे शिजलेली दाळ , गरम मसाला, मिर्ची पावडर,चिंचेचा कोळ , आमसूल, आणि गुळ घालावा
त्यामधे चकोल्या शीजतील एवढे पाणी ओतावे, आणि थोड़ा वेळ उकलावे .

No comments: