उकडिचे साहित्यः १ कप तांदळाचे पीठ , १ कप पाणी, चिमुट्भर मीठ, १ चमचा तुप.
सारणः २ वाटी खोवलेले खोबरे, २ वाटी चिरलेला गुळ, ४ चमचे खसखस, वेलचि पूड, काजु,बदाम्,पिस्ते,चारोळे.
क्रुति: सारणः प्रथम खोबरे आणि गूळ एका भांड्यामधे मंद गॅसवर ठेवा. सतत ढवळत रहावे, मग मिश्रण मोकळे होऊ लागले की गॅस बंद करावा.
उकडः एका भांड्यामधे १ कप पाणी गॅसवर ठेवावे आणि चिमूट्भर मीठ घालावे. पाण्याला उकळी आली की १ चमचे तुप टाकावे , आणि पुन्हा उकळी आली की तांदळाची पीठि टाकावी, आणि हलवावे. पीठाच्या गाठी होऊ देऊ नयेत. मग हे पीठ चांगले मळुन घ्यावे आणि लिंबाएवढे गोळे करावेत. हे गोळे लाटुन घ्यावे किंवा हाताने थापावे आणि त्यामधे सारण भरावे. नैवेद्याचे मोदक बनवताना ५,७,९,११ अशा पारया बनवाव्यात आणि ११ किंवा २१ मोदक गणपती समोर ठेवावे.
2 comments:
Belated wishes dear....Hope you had yum time...
Thank you for addding my blog in your blog roll.
Post a Comment