साहित्य :
१ वाटी आल्याची पेस्ट ,
२-३ चमचे दूध,
२ वाटी साखर ,
१ चमचा साजूक तूप .
कृती:
प्रथम आले स्वच्छ धुवुन घ्यावे.
आले बारीक़ चिरावे आणि मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी , पेस्ट चांगली होण्यासाठी थोड़े दूध घालावे.
कढईत किंवा नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये आल्याची पेस्ट + २ वाट्या साधी साखर एकत्र करावे .
हाय गॅसवर ढवळत राहावे.
मिश्रण जरा घट्ट होत आले की त्यात एक चमचा तूप सोडावे.
तुपाचा हात लावलेल्या ताटात मिश्रण थापून घ्यावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.
मिश्रण व्यवस्थित दाट झाल्यावरच ताटात थापावे नाहीतर वडी चिकट होण्याचा संभव असतो.वड्या लगेच डब्यात भरू नये काही तास मोकळ्या हवेत उघड्याच ठेवाव्यात.
कोरड्या खोकल्यासाठी या वड्या खूपच आराम देतात .